विक्रोळीत सोमवारी झालेल्या युतीच्या सभेत अचानक पाऊसधारा कोसळल्या. शिवसैनिकांनी नेत्यांच्या विचारांनी न्हाऊन निघण्यासाठी कोण्त्ताही व्यत्यय येऊ नये, यासाठी खास भगवी छत्री तयार ठेवली होती. यापैकीच एक भगवे छत्र शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या शिरावर ठेवण्यासाठी भाजपचे राज पुरोहित, सुभाष देसाई पुढे सरसावले. कदाचित महाराष्ट्रचे पुढील मुख्यमंत्री म्हणून जोशीसरांना भाजपाची मान्यता असे तर सुचवायचे नाही ना!
सौजन्य:- महाराष्ट्र टाइम्स