मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते...
मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते...
मन उधाण वार्याचे गुंज पावसाचे ,का होते बेभान कसे गहिवरते...
मन उधाण वार्याचे ...
आकाशी.. स्वप्नांच्या.. हरपुन पान शिरते,
हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते,
सावरते बावरते झडते अडखळते का पडते...
कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते...
मन तरंग होउन पाण्यावरती फ़िरते...
अन क्षणात फिरूनी अभाळाला भीडते...
मन उधाण वार्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते...
मन उधाण वार्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते...
मन उधाण वार्याचे...
रुणझुणते.. गुणगुणते.. कधी गुंतते हरवते..
कधी गहिर्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते..
तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते..
कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे भुलते...
जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते...
भाबडे तरी भासांच्या मागुन पळते...
मन उधाण वार्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते...
मन उधाण वार्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते...
मन उधाण वार्याचे..
To hear Online go to below URL
http://www.in.com/music/track-mann-udhan-173417.html
Video from Youtube
No comments:
Post a Comment